On Goa Files

There’s new research on conversions to Christianity in early modern Goa and it focuses on the eager uptake of Christianity among upper-caste natives. I am not sharing its arguments here because it hasn’t been published in the public domain yet. But when it will come out, some of these misconceptions about force and conversion will be addressed.
First of all, it’s a misconception that Inquisition was targeted at Hindus. It primarily targeted Jews, Muslims, and newly converted Christians. Two upper-caste merchants, Timoja Nayak and Mhal Pai Vernekar, invited Afonso de Albuquerque to invade the island of Goa which was then under the Bijapur Sultanate rule. There are records of people moving and migrating towards the south even before the arrival of the Portuguese (Ref: Parobo, Parag. India’s First Democratic Revolution. 2015).
‘The Triumphant Trio’ (2015) by Viraj Naik depicts Albuquerque with Nayak and Pai Vernekar standing on a pile of bodies, hinting that the Portuguese presence in Goa stood in collaboration with the native elites and was built on the dead bodies of its labouring castes. The two dogs are silent witnesses to this history.
Moreover, communities that claim this victimhood of persecution by the Portuguese collaborated with the Portuguese colonial state throughout their stay in Goa. They secured administrative employment, got land transferred into their names, and accumulated private property. They continue to hold on to most of these privileges to date. Goa’s integration with the Indian Union never dented the wealth and power accumulated by them.
What is evident from Nayak and Pai Vernekar’s collaboration with Albuquerque is they pushed the rest of the Goan communities under colonial subjugation for four centuries to safeguard their narrow trading interests.
The Goan Bahujans were robbed of their land, forced into feudal servitude, kept away from opportunities of acquiring knowledge, and also sexually exploited by the same upper caste communities. But it is somehow they were the victims of this persecution by the colonial state.
Every day I resist writing about Goan history because social media isn’t the right platform to bring academic nuance to any discussion. But when you see 20-year-old chintus flaunting their WhatsApp history lessons to claim some mythical persecution, I wonder what my forefathers should have done to the people who subjugated and exploited them more closely than the Portuguese state? What files (or folios) should we open to look for the continuous exploitation of Goa’s labouring castes by its feudal elite?

रीफिगरिंग गोवा – गोव्याची मार्क्सवादी मांडणी

मानव्यशास्त्रांतून गोव्याविषयी जे काही लिहिले आहे त्यात गोव्याच्या इतिहासाची तसेच समाजजीवनातील क्लिष्टता व विरोधाभास ह्या दोन गोष्टी ठळक आढळून येतात. आणि हि मांडणी काहीश्या सोप्या पद्धतीने समजायची असेल तर ज्या संकल्पनांवर हि मांडणी आधारलेली आहे त्यांचाही थोडाफार परिचय करून देणे गरजेचे आहे. गोव्याविषयी, त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय जीवनाविषयी समजायचं झालं तर कुठलाही एक पुस्तक ठोस सांगता येणार नाही. अनेक मांडणीतून इथले विरोधाभास आणि क्लिष्टता समजून घ्यावी लागते. म्हणूनच ह्या सदराची सुरुवात कुठून करावी हा जरासा अवघड प्रश्न होता. पण त्यातल्या त्यात एक पुस्तक कुठलं असेल तर ते डॉ. रघु त्रिचूर ह्यांचं ‘रीफिगरिंग गोवा’ हे २०१३ साली प्रकाशित झालेलं पुस्तक. अमेरिकेतल्या टेम्पल विद्यापीठात त्यांनी अँथ्रोपॉलॉजी शाखेत पीएचडी मिळवली असून हे पुस्तक त्यांनी लिहिलेल्या पीएचडी प्रबंधातून साकार झालं आहे. ते सद्या सॅक्रमेंटो येथील कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू आहेत.

ह्या पुस्तकात गोव्याच्या अर्थव्यवस्थेला समोर ठेवून एकेकाळी व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याचं स्वातंत्र्योत्तर काळात पर्यटन स्थळात कसं रूपांतर झालं ह्याविषयी ते काही मूलभूत निरीक्षणं मार्क्सवादी चौकटीतून मांडतात. मार्क्सने आपल्या लेखनात ऐतिहासिक भौतिकतावादाची (हिस्टोरिकल मटेरियलिजम) मांडणी केली आहे. त्याच्या द्वंदात्मक भौतिकतावादाच्या (डायलेक्टिकल मटेरियलिजम) सिद्धांताला पूरक अशी हि संकल्पना आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर कुठल्याही समाजातील इतिहासाच्या किंवा राजकारणातल्या उलथापालथीचे स्पष्टीकरण त्या समाजातील अर्थव्यवस्था कशी आणि कुठल्या संबंधावर आधारित आहे त्यात सापडू शकते असे मार्क्स म्हणतो. ह्यातले द्वंद्व हे प्रामुख्याने भांडवलशाही आणि श्रमिक ह्या दोन वर्गात असते. बऱ्याच अंशी हि मांडणी अर्थव्यवस्थेत जमिनीच्या मालकी कोणाकडे आहेत, त्यावर कर/महसूल कसा आणि कोण मिळवतो, तो मिळवण्यासाठी, जमीन कसण्यासाठी कुठला वर्ग आपले श्रम खर्ची घालतो इत्यादी बाबींकडे लक्ष दिले जाते. श्रमिक वर्गाच्या शोषणावर भांडवलशाही वर्ग आपली श्रीमंती निर्माण करतो आणि ह्या जाणिवेतूननच ऐतिहासिक बदल आणि स्थित्यंतरं येतात असा त्याचा सारांश आहे. इतिहास समजण्याची हि एक मार्क्सवादी चौकट आहे. खुद्द गोव्याचे सुपुत्र दामोदर धर्मानंद कोसंबी हे ह्या चौकटीतले एक आद्य भारतीय इतिहासकार मानले जातात.

गोव्याच्या इतिहासाचे लेखन आणि त्याचे विश्लेषण हे ‘गोवा दुरादा’ आणि ‘गोवा इंडिका’ ह्या दोन ढोबळ पद्धतीत विभागले आहे. ‘गोवा दुरादा’ म्हणजे पोर्तुगीज भाषेत सोनेरी गोवा. ह्यांतर्गत गोव्याची जीवनपद्धती आणि संस्कृती हि युरोपियन आणि कॅथॉलिक मूल्यांवर आधारलेली आहे हे मांडणारे मतप्रवाह मोडतात. एकोणिसाव्या शतकातील पोर्तुगीज साम्राज्याच्या ढासळत्या प्रतिमेमुळे स्थानिकांनी बंड करून पोर्तुगीज सत्तेला आव्हान करू नये म्हणून एकेकाळी पूर्वेकडील रोम म्हणून ओळखले जाणाऱ्या सोनेरी गोव्याची प्रतिमा लोकप्रिय करण्यात आली होती. जेणेकरून स्थानिक उच्चभ्रू लोकांनी ते सोनेरी दिवस परतण्याची इच्छा बाळगून तसेच पोर्तुगीज साम्राज्यातच आपले हितसंबंध सुरक्षित राहतील हे आश्वस्त करण्यासाठी गोवा दुरादाचा वापर वेळोवेळी करण्यात येत असे.

ह्या मतप्रवाहाला प्रतिक्रिया म्हणून ‘गोवा इंडिका’ हा मतप्रवाहही लोकप्रिय झाला. गोवा इंडिका अंतर्गत गोवा हा भारतीय उपखंडाच्या कसा अविभाज्य भाग आहे, येथील लोक आणि संस्कृती हि युरोपीयन आणि कॅथॉलिक नसून ती भारतीय आणि हिंदू आहे हे मांडण्याचा प्रयत्न चालू होते.

त्रिचूरांच्या मते हे ऐतिहासिक अध्ययनाचे दोनही प्रवाह गोव्याच्या समाजजीवनाविषयी एक मर्यादित चित्र उभे करतात. गोवा दुरादात गोव्याच्या आणि पर्यायाने गोवेकरांच्या इतिहासाला बाजूला करण्यात आले तर गोवा इंडिकामध्ये पोर्तुगीज वसाहतवादाचे गोमंतकीय समाजावरचे झालेले परिणामांबद्दलचे विश्लेषण नाही व किंबहुना त्याची हेटाळणीच जास्त केली गेली आहे. ह्या मतप्रवाहांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्रिचूर म्हणतात कि गोव्याच्या समाजाचं विश्लेषण हे भाटकार-मुंडकार संबंधावर करणं गरजेचं आहे. पोर्तुगीज विरुद्ध गोमंतकीय हे चित्र मर्यादित आहे कारण त्यात ‘गोमंतकीय’ समाज हा एकजिनसी समाज म्हणून रंगविला गेला आहे. जातवार आधारित समाजात स्थानिक भाटकारांकडे जमिनी होत्या तर मुंडकारांचे शोषण भाटकार आणि वसाहतवादी वर्गाने दोघांनी संयुक्तरित्या केले असताना फक्त पोर्तुगीजांवरच त्याचे खापर फोडून भाटकारवर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी मांडणी त्रिचूर करतात.

स्वातंत्र्योत्तर गोव्याचे राजकारणदेखील ह्याच भाटकार-मुंडकार धर्तीवर समजण्याचा प्रयत्न त्रिचूर करतात. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्तेपर्यंतची झेप जरी हिंदू बहुजन समाजाच्या पाठबळावर झाली असली तरी त्रिचूरांच्या ह्या गोष्टीला मुंडकार वर्गाच्या हितातून निर्माण झालेली परिस्थिती असे दर्शवतात. ह्या अनुषंगाने किंवा विलीनीकरणाने वा घटक राज्य मिळाल्याने जमिनीच्या मालकीवर कसा परिणाम झाला असता किंवा झाला हे विश्लेषण करणे महत्वाचे ठरेल. वरवर गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे लढे वाटणाऱ्या ह्या चळवळींमागे नक्की भाटकार-मुंडकार वर्गाचे हितसंबंध कसे एकमेकांविरुद्ध ठाकले होते आणि ह्या चळवळींच्या निकालाचा फायदा नेमका कोणत्या वर्गाला झाला हे समजण्यासाठी त्रिचूरांचे पुस्तक महत्वाचे आहे.

गोव्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होण्याच्या प्रक्रियेबद्दल त्रिचूर म्हणतात कि गोवा पोर्तुगीज अमलाखाली असल्याने इथली प्रशासन आणि कामकाजाची पद्धती वेगळी होती आणि ह्या वेगळ्या व्यवस्थेला सरावलेला सत्ताधारी वर्ग त्याची स्थानिक अर्थ/समाजव्यवस्थेत असलेली मक्तेदारी अबाधित राखण्याचे प्रयत्न करत होता. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेतील उदयाने बहुजन समाजही सत्तेत थेट सामील होत होता. ह्या सर्व कारणांमुळे गोवा हा एक वेगळेच समाजभान असलेला प्रदेश आहे असे चित्र राष्ट्रीय पातळीवर उभे राहिले. ह्या एकूणच संभ्रमावर आणि सत्तांतराच्या अडचणींवर मात करण्यासाठी पर्यटन हा एक नामी उपाय ठरला. गोव्याला प्रशासकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतात सामावून घ्यायचे असेल तर ते गोव्याचे वेगळेपण अधोरेखित करूनच घ्यावे लागेल हे केंद्र सरकारला कळून चुकले. हेच सांस्कृतिक वेगळेपण गोव्याच्या पर्यटन धोरणाचा पाया बनले. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गोवा हे पोर्तुगीज संस्कृतीने नटलेला प्रदेश आहे हा समज जसा पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी रूढ केला तसाच तो मुक्तीनंतरच्या काळात भारतीय सरकारनेसुद्धा केला. ह्यातून गोवा भारतीय प्रशासनात आणायला मदत झालीच पण गोव्यातील आणि भारतातील वसाहतवादाच्या इतिहासातील वेगळेपणाला बगल देण्यात यश आले.

गोव्याच्या इतिहासा व समाजाचे वर्णन बऱ्याच समाजशास्त्रज्ञांनी आणि इतिहासकारांनी केले आहे पण गोव्यातले समाजजीवन जमीनीचे मालकी हक्क तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या भाटकार-मुंडकार संबंधांशी निगडित आहे अशी मांडणी करून त्याचे नीट मार्क्सवादी पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केल्याने त्रिचूर ह्यांचे पुस्तक गोव्यावर लिहिल्या गेलेल्या इतर पुस्तकांपेक्षा नक्कीच उजवे (कि डावे?) ठरते.

(दैनिक गोमंतक शनिवार दि २३ जानेवारी २०२२)

Making tech ethical – a lost cause?

I quit Computer Science for good in 2014. Not for any ethical reasons. The college I was enrolled in to pursue my post-graduate degree made me ask some basic questions, and towards the end of that process, I couldn’t see myself in tech. I have never looked back except for the passing lure of digital humanities. Not that I was genius at coding either. I had particular interests in user interfaces and web-based applications. When desktop software was becoming obsolete and things were moving to the cloud. One of the first codes I pushed out in the world was while interning with a software firm in Goa. The project was to design a job application portal. I felt I wrote this code, and someone would find a job due to it. I low-key felt proud of myself.

Cut to the recent launch of an app that populated photos of Muslim women and auctioned them online. Someone wrote an entire app, pushed it to GitHub, and has managed to dehumanise a community as a whole purely out of hate. The boy, 21 years of age, was arrested by Mumbai Police. His collaborator is a woman and is 18. Not that such people should get a pass due to their age.

If I recall correctly, Facebook too started as a website that rated women by mining their pictures. Zuckerberg since then has advanced to destroying democracies and making billions of dollars through creating ecosystems of misinformation. Sergei/Larry suppress unions and free speech. Linus Torvalds was taken off Linux Kernel Mailing List (something that he himself started and transformed computing) for his offensive behaviour towards women. Richard Stallman is a sexual harasser. And Bill Gates is killing agriculture and healthcare in Global South through ‘philanthropy’.

Closer to home, Nilekani built Aadhar and Wipro provided the software for NRC.

These guys were our icons once upon a time. White/Upper Caste males, propelled into fame and wealth through their innovations, today have become new-age imperialists with no accountability. They and their corporations have created platforms and problems that wil outlive them.

Who does the current generation of Computer Science students look up to? Maybe Elon Musk. He’s no different. The dudebro culture of the tech industry is a monster that hasn’t been tamed to any measure. It seems far-fetched, but the same culture incubates an environment where an app auctioning Muslim women is possible. Not to forget the poisoning of India’s public discourse with a constant supply of hate and dog-whistling.

In the 2000s, I harboured a naive belief that tech will liberate us. Instead, a decade later it has only exacerbated the precarity of the world that we inhabit. These people, platforms, and products are not elected by people but they exercise so much power in/on this world. They alter policies, economies, erase democracies, control information, abet incarceration of people and every possible crime against the dignity of life.

I wonder what teachers in engineering and computer science departments think about this? How does one respond to this degeneration catalysed by the tech industry as someone engaged in training new tech workers? Should we rethink disciplines? Is it possible to create coders sensitive to the oppression around us? Can they be convinced that the code they write shouldn’t infringe upon people’s right to life and dignity?

दिल चाहता है फोर्ट किधर है?

गोव्यातल्या शापोरा किल्ल्याचं ‘दिल चाहता है फोर्ट’ असं अनौपचारिक नामांतर होऊन जवळपास दोन दशकं उलटली आहेत. पोर्तुगीज काळात बांधलेला हा समुद्रतटावरचा किल्ला आज त्याच्या ऐतिहासिक वैशिष्टयासाठी कमी आणि दिल चाहता है ह्या चित्रपटातल्या दृश्यासाठी अधिक लोकप्रिय आहे. दिल चाहता है मधली आमिर, सैफ आणि अक्षय खन्ना शापोरा किल्ल्यावर कॅमेऱ्याला पाठमोरे बसून समुद्राकडे बघून भविष्याचा विचार करत असलेली फ्रेम हि खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे त्या किल्ल्यावर जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली. तुम्ही इंस्टाग्रामवर शापोरा किल्ल्यावर काढलेले फोटोज बघाल तर आजही त्या फ्रेमचा पगडा तिथं भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये किती आहे ते दिसून येईल.

आधुनिक हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘दिल चाहता है’ हा एक महत्वाचा चित्रपट मानला जातो. नव्वदीतल्या ‘हम आपके है कौन?’ ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ‘परदेस’ ह्या कुटुंबप्रधान चित्रपटांपेक्षा २००१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट फारच वेगळा होता. ह्यात कॉस्मोपॉलिटन, शहरी भारताचं प्रभावी चित्रण करण्यात आलं होतं. खुल्या अर्थव्यवस्थेनंतर भारत ग्लोबल भांडवलशाहीचा भाग बनल्याने आलेली आर्थिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरं ह्या चित्रपटात अचूकपणे टिपली गेली. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आर्थिक उदारीकरणाचं एक दशक उलटून गेलं होतं. बऱ्याच सामाजिक आणि सांस्कृतिक पडझडी होऊन नव्या जाणिवा मूळ धरत होत्या. ऑफशोर सर्व्हिसेसच्या वाढीनंतर भारतातील आयटी सेक्टर भरभराटीला येऊन ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ ह्या ब्रीदवाक्यावर पोसलेली एक तरुण पिढी अर्थव्यवस्थेचा भाग बनत होती, जिचा नव्वदीपूर्व भारतातील राजकीय स्थित्यंतराशी काहीच घेणंदेणं नव्हतं. ह्याच काळात पर्सनल गॅजेट्स बाजारात येत होते. मोबाइल फोन, हॅंडीकॅम, डिजिटल कॅमेरा, इंटरनेट ह्या सगळ्यांमुळे आपण घेत असलेले वैयक्तिक अनुभव टिपून ठेवून ते शेअर करण्याची प्रक्रिया मूळ धरत होती. हि उपकरणे बाळगणं ‘कूल’ असण्याचं सधन लक्षण होतं. 

ह्या चित्रपटातील प्रमुख पात्रं हि उच्चभ्रू आणि उच्चवर्णीय समाजातून असली तरी भारतात येऊ घातलेल्या महत्वकांक्षी मध्यम वर्गातील तरुण वर्गानेही ह्या चित्रपटाशी लोकप्रियता मिळवली. हि पात्रं क्लब्समध्ये जाणारी, रंगीबेरंगी भिंती असलेल्या ऐसपैस घरांमध्ये राहणारी होती. आणि मुख्यतः त्यांच्या आयुष्यातील निर्णय आणि दिशा ठरवण्यात त्यांच्या कुटुंबातील लोकांचा नगण्य वाट होता. नव्वदीतल्या कुटुंबप्रधान चित्रपटांत नायक नायिकांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि आयुष्य ह्यांच्या आड येणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळ्याचा संघर्ष होता. दिल चाहता है येईपर्यंत हे अडथळे नगण्य ठरत आयुष्य हे आपल्या अटीवर आणि विविध अनुभव घेऊन जगलं पाहिजे हा आशय पहिल्यांदा प्रभावीपणे हाताळण्यात दिग्दर्शक फरहान अख्तर यशस्वी ठरले.

दिल चाहता है या चित्रपटामुळे गोव्यातल्या पर्यटन उद्योगाला एक निर्णायक कलाटणी मिळाली. ह्याआधीही गोवा आणि गोव्यातील लोकांविषयीचे समज बॉबी, एक दुजे के लिये, कभी हा कभी ना सारख्या हिंदी चित्रपटातून रूढ झाले होते. दिल चाहता है मधून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी नवे उद्देश आणि संदर्भ प्राप्त झाले. गोवा हा तारुण्यात, मित्रांबरोबर फिरून बघायचा प्रदेश आहे, तुमच्या मनातील कोलाहलांना इथे येऊन उत्तरं मिळतात, आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त होते, नवीन अनुभव आणि नवीन लोकांना भेटता येते असे बरेच काही समाज गोव्याला जाण्याविषयी जोडले जाऊन लागले. गोवा हे शहरी धावपळीपासून विसावा घेण्यासाठी जाण्याचं हमखास ठिकाण बनलं. ह्या चित्रपटानंतर  तारुण्य आणि मैत्री ह्या दोन गोष्टींचा अनुभव पूर्णपणे घेण्यासाठी गोवा हे एक आधुनिक तीर्थक्षेत्र बनले. ‘रोडट्रीप’ हा प्रकार अधिक लोकप्रिय झाला. 

दिल चाहता है मध्ये जसं गोव्याची एक विसावा घेण्यासाठीचं स्थळ म्हणून जशी प्रतिमा अधोरेखित केली गेली ती तशी नेहमीच नव्हती. गोव्याला स्वतःचा जसा राजकीय आणि सामाजिक इतिहास आहे तसाच गोवा पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याचा एक रंजक इतिहास आहे. गोव्याची प्रतिमा एका सुस्तावलेल्या प्रदेशाची आहे जिला आधुनिकतेचा, औद्योगिकरणाच्या स्पर्श झालेला नाही. तो अनुभव आपण एकविसाव्या शतकात गोव्यात येऊन घेऊ शकतो ह्यामुळेही गोव्याबाबतीत एक प्रचंड मोठं आकर्षण लोकांमध्ये आहे. आजच्या गोव्यातील तफावत हि प्रतिमा टिकवून ठेवण्यातला आणि स्थानिक लोकांच्या महत्वाकांक्षांमधला संघर्ष दिसून येतो. पण हा संघर्ष गोव्यात पर्यटन व्यवसाय सुरु झाल्यापासून दिसत आलेला आहे.

विश्रांतीसाठी समुद्रावर जाण्याचा इतिहास

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी गोव्यातले समुद्र किनारे हे प्रमुख आकर्षण आहे. खरंतर लोकांनी समुद्रावर विसाव्यासाठी आणि स्नानासाठी जाणे ह्याचाही मजेशीर इतिहास आहे. एकेकाळी खलाशी आणि व्यापारी सोडले तर समुद्रकिनाऱ्यावर जाणे तसे बाकी लोकांमध्ये प्रचलित नव्हते. अठराव्या शतकाच्या मध्यात युरोपियन जीवनशैलीच्या संदर्भात समुद्रावर जाण्याला नवीन संदर्भ  प्राप्त झाले होते. युरोपियन उच्चभ्रू समाजातील लोक व्यायाम व समुद्रस्नान करण्यासाठी तसेच ताजी हवा घेण्यासाठी समुद्रकिनारी जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीचं केंद्रस्थान असलेल्या ब्रिटनमध्ये उच्चवर्णीय समाज स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक होऊ लागला होता. कामगार वर्ग हा कारखान्यात करण्यात येणाऱ्या शारीरिक श्रमामुळे चांगले शरीर कमवत होता. त्यामानाने मालकवर्ग, कारखानदार हे शारीरिकदृष्ट्या दुबळे होते. ह्या दुबळेपणाचा गंड येऊन ह्या उच्चभ्रू वर्गात व्यायामाचे महत्व वाढले. निरोगी शरीरासाठी ह्या वर्गाला समुद्रस्नानाचा सल्ला त्यांचे वैद्यकीय सल्लागार देत होते. समुद्राच्या पाण्यात औषधी गुण असतात आणि त्या पाण्याने त्वचेचे आणि हाडांचे रोग बरे होतात हा समज रूढ झाला. 

औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरी जीवनाची गती वाढत होती. धकाधकीच्या आयुष्यापासून काही काळ विश्रांती म्हणून समुद्रावर जाणे ह्या काळात प्रचलित झाले. रेल्वेच्या आगमनानंतर हि प्रक्रिया अधिक लोकप्रिय आणि सुलभ झाली. लांबचा प्रवास करणे स्वस्त झाले. औद्योगिक क्रांतीच्या नुकतेच साधन होऊ लागलेल्या नवीन मध्यमवर्गापाशी अश्या गोष्टीत रमण्याची फावला वेळ आणि पैसे दोन्ही उपलब्ध होत होते. पूर्वी vacation ह्या शब्दाचा अर्थ अपरिहार्य कारणासाठी कामावर गैरहजर राहण्यासाठीची सुटी असा होता. औद्योगिक क्रांतीच्या काळात त्याचा विश्रांती घेण्यासाठीची रजा असा बदलला.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरनंतरण हीच प्रक्रिया काहीश्या अधिक आधुनिक आणि व्यापक रूपात आपल्याला भारतात बघायला मिळाली. महानगरांच्या आणि औद्योगिकीकरण झालेल्या शहरांच्या कोलाहलापासून दूर अश्या जागांवर पर्यटनासाठी जाणे अधिक लोकप्रिय बनत गेले. गोव्यात एकाकेकी नव्वदीनंतर वाढलेला पर्यटन उद्योग हे त्याचेच द्योतक आहे. दिल चाहता हैच्या यशाने गोव्यातला पर्यटन उद्योग वाढला आणि त्याचं स्वरूप बदललं हे अनुभवाने सांगता येते पण आकडेवारी जुळवून हे विश्लेषण अजून कोणी केलेले नाही.

गोव्याच्या पर्यटन उद्योगाचा आणि सरकारी धोरणाचा इतिहास

१९६३च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव करून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार गोव्यात स्थापन झाले. हे स्वतंत्र भारतातील केरळनंतर दुसरे बिगर काँग्रेस राज्य सरकार होते. बहुजन समाजाच्या वृद्धीच्या प्रचारावर निवडून आलेल्या ह्या सरकारांतर्गत ‘कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर’ ह्या तत्वाने कूळ कायदा संमत करून पारंपरिक मुंडकारांना जमीन मालकीचे हक्क प्रदान करण्यात आले. तळागाळात शिक्षणाचा प्रसार, शेतीविषयक धोरणे, आणि कूळ कायदा ह्या कार्यक्रमावर प्रचंड लोकप्रियता मिळवलेले बांदोडकर सरकारपाशी पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी ठोस काही धोरणे नव्हती. गोव्यात खाजगी मालकी तत्वावर खाणी चालू होत्या. बांदोडकर हे स्वतः एक खाणमालक होते. गोव्यातील खाणी ह्या किनारपट्टीभागापासून दूर होत्या. त्यामुळे खाणव्यवसायातून रोजगार आणि अर्थव्यवस्थेचे फायदे हे त्याच भागात सीमित होते आणि किनारपट्टी भागात त्याचा काही विशेष प्रभाव नव्हता.

ह्या सर्वचा सगळ्यात जास्त फटका किनारपट्टीतल्या खारवी (मच्छिमार) कॅथॉलिक लोकांवर झाला होता. खाणव्यवसायापासून चालना मिळत असलेल्या अर्थव्यवस्थेत ते भाग घेऊ शकत नव्हते. गोव्यातले राहणीमानही हळू हळू महाग होत चालले असल्याने केवळ पारंपरिक मासेमारी करून त्याचे भागत नव्हते. त्यात ट्रॉलर्सद्वारे होत असलेल्या आधुनिक मासेमारीसमोर त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते. ह्या सगळ्यामुळेच त्यांच्या उत्पन्नावर गदा आली होती आणि त्यांना अर्थार्जनाचे नवीन मार्ग शोधणे क्रमप्राप्त होते.

१९६६ साली नेपाळमार्गे गोव्यात हिप्पी प्रवाश्यांची पहिली तुकडी आली. त्यांना कदाचित नेपाळमधून हाकलून लावले असल्याने किंवा तिथे बराच काळ वास्तव्य केल्याने आपले बस्तान बसविण्यासाठी दुसऱ्या एका जागेच्या शोधात ते गोव्यात आले आणि बार्देस तालुक्यातील किनाऱ्यांवर दाखल झाले. खारवी समूहांची वस्ती ह्याच किनारपट्टी भागात असल्या कारणाने आलेल्या हिप्पी प्रवाशांची राहण्याची व खाण्याची सोय त्यांनी करायला सुरुवात केली. कूळ कायद्यांतर्गत त्यांना तिथले जमिनीचे मालकी हक्क प्राप्त झाले होते ते खारवी समूहाला फायदेशीर ठरले. तत्कालीन सरकारचे पर्यटनविषयक काहीच ठोस धोरण नसल्याने हा पूर्ण व्यवहार हिप्पी प्रवासी आणि खारवी समूह ह्यांच्यांतच थेट देवाणघेवाणीतून चालला होता. सुरुवातीला माफक भाडे आकारून प्रवाश्यांची राहण्याची सोय ते आपल्या घरातच करत असत. ह्यातून येणाऱ्या पैशांनी घरखर्च भागत असे. त्यांचा पारंपरिक मासेमारीचा उद्योग चालूच असल्याने हिप्पी प्रवाश्यांकडून मिळणारी रक्कम हि वरची कमाई होती. ह्या पैशातून त्यांनी घराची डागडुजी केली आणि प्रवाश्यांना राहायला घर भाड्यावर देऊन स्वतः बाजूला एका खोपटीवजा घरात राहू लागले. किनाऱ्यापाशी झापांच्या छताच्या खोपट्या बांधून तिथे प्रवाश्यांना जेवण देणेही कालांतराने सुरु झाले. आज गोव्यातल्या किनारपट्टीवर प्रसिद्ध असलेले सीफूडसाठी प्रसिद्ध असलेले शॅक्सचे हे एक पूर्वरूप होते असे म्हणायला हरकत नाही. 

पर्यटन मोसम ऑक्टोबर ते मे पर्यंत चालायचा. जूनमध्ये पावसाचे वेध लागले कि ह्या खोपट्या उतरवल्या जायच्या आणि प्रवाशांचीही वर्दळ कमीच असायची. पर्यटनातून येणाऱ्या पैश्यातून स्थानिक खारवी समूहाची आर्थिंक सुबत्ता वाढली. हळूहळू त्यांनी पारंपरिक मासेमारी कमी केली तसेच त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनी उच्चवर्णीय जमीनदारांच्या शेताभाटात मजूर म्हणून जायचे बंद केले. त्यांच्या राहणीमानात कमालीचा फरक पडला आणि आता त्यांना पारंपरिक मासेमारी आणि मजुरी करण्याची गरज राहिली नव्हती. त्यामुळेच स्थानिक जमीनदारांनी वेगाने वाढत चालेल्या ह्या पर्यटनव्यवसायाविरुद्ध तक्रारी करण्यात सुरु केल्या. पण ह्या धंद्याची वाढता आलेख पाहून कालांतराने तेही ह्या व्यवसायात सहभागी होऊ लागले.

गोव्याच्या पर्यटनाची प्रतिमेचे सांस्कृतिक संदर्भ

भारताला पश्चिमेकडील अरबी समुद्राची फार मोठी किनारपट्टी लाभली आहे. अगदी गुजरातपासून केरळपर्यंत विस्तारलेल्या ह्या किनारपट्टी भागात समुद्र पर्यटनासाठी गोवा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. केरळही पर्यटनासाठी प्राधान्य दिले जाणारे राज्य आहे पण त्या राज्याच्या पर्यटनाची प्रतिमा गोव्याच्या पर्यटनापेक्षा खूपच वेगळी आहे. ह्यात केवळ समुद्रकिनाऱ्यामुळे नाही तर गोव्याची ‘सुशेगाद’ म्हणून ओळखली जाणारी संथ जीवनशैली, इथल्या लोकांचं आदरातिथ्य, टुमदार कौलारू घरं आणि खासकरून गोव्यातल्या गावाशहरामध्ये असलेला एक दक्षिण युरोपियन गावाचा आभास. इथे दारू पिणे, मासे खाणे आयुष्याचा आनंदच नाही तर उपभोग घेणे लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रतिमेचा भाग आहेत आणि त्या प्रतिमेच्या सामर्थ्याच्या जोरावरच गोव्यातील पर्यटन व्यवसायाची वृद्धी होत आलेली आहे.

हे सगळे जर थोड्याफार प्रमाणावर खरे असले तरी हि प्रतिमा आभासी आहे असेच म्हणावे लागेल. गोव्यातल्या राहणाऱ्या लोकांना इतर लोकांसारख्याच महत्वकांक्षा आणि अपेक्षा आहेत. रोजगाराच्या मर्यादित संधी, राजकारणातील उलथापालथ, नैसर्गिक संसाधनांचा होणार ऱ्हास, धर्मभेद, जातीभेद ह्या इतर भारतात भेडसावणाऱ्या समस्या गोव्यालाही लागू पडतात. पण ह्या सगळ्या समस्यांना बगल देऊन पर्यटनासाठी म्हणून गोव्याची जी प्रतिमा निर्माण केली जाते त्यात गोव्यातल्या स्थानिकांचे प्रश्न, त्यांच्या महत्वाकांक्षांना बगल देऊन हि आभासी प्रतिमा निर्माण केली जाते. कुठल्याही शहराविषयी किंवा स्थळांविषयी जे काही प्रचलित समज असतात ते एका विशिष्ट हेतूने निर्माण केले जातात. गोव्याच्या ह्या दक्षिण युरोपियन गावाची जी प्रतिमा निर्माण केली जाते त्याचाही इतिहास काहीसा असाच आहे.

साठ ते ऐशींच्या दशकापर्यंत गोव्यातल्या राजकारणात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पक्ष ह्या दोन स्थानिक पक्षांची मक्तेदारी होती. बांदोड्करांच्या अमाप लोकप्रियतेमुळे आणि मगोपक्षाच्या बहुजनवादी धोरणांमुळे दोन दशके ह्या पक्षाकडे निर्विवाद सत्ता होती. ऐशीच्या दशकात ह्या स्थानिक पक्षांमध्ये दुही माजून बऱ्याच नेत्यांनी काँग्रेसमध्ये पक्षांतर करण्याचा पायंडा सुरु केला आणि हे पक्ष फुटू लागले. ह्याच काळात गोव्यात काँग्रेस पक्ष पुन्हा डोके वर काढू लागला होता. बरेचसे फुटलेले नेते काँग्रेसमध्ये सामील होऊन काँग्रेस पक्ष ऐशीच्या उत्तरार्धात स्थानिक सत्तेत वरचढही झाला. गोव्यातल्या पर्यटनव्यवसायाला धोरणात्मक दिशा देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले. १९८३ साली ब्रिटिश कॉमनवेल्थ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची एक परिषद दिल्लीत झाली होती आणि तिथे उपस्थित नेत्यांना विरंगुळ्यास गोव्यात आणले होते. गोव्याला पर्यटनस्थळ म्हणून जागतिक नकाशावर अंकित करण्यासाठीचे ते पहिले धोरणात्मक पाऊल होते. त्यांनतर कालांतराने १९८७ साली गोव्याच्या पर्यटन धोरणाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. ह्याच साली दोन दशके चालेल भाषावाद विराम देऊन कोकणीला गोव्याच्या राज्यभाषेचा दर्जा देत गोवा भारतीय संघप्रदेशात एक घटक राज्य बनले होते. ह्या प्रादेशिक भाषिक अस्मितेच्या वादातून जे काही समुद्रमंथन झाले त्यावरच गोव्याचे ‘वेगळेपण’ जपणारे पर्यटन धोरण आखले गेले.

ह्या प्रतिमेला सांस्कृतिक आवरण होते ‘गोवा दुरादा’ ह्या मतप्रवाहाचे. गोव्याच्या इतिहासाचे लेखन आणि त्याचे विश्लेषण हे गोवा दुरादा आणि गोवा इंडिका ह्या दोन ढोबळ पद्धतीत विभागले आहे. गोवा दुरादा म्हणजे पोर्तुगीज भाषेत सोनेरी गोवा. ह्यांतर्गत गोव्याची जीवनपद्धती आणि संस्कृती हि युरोपियन आणि कॅथॉलिक मूल्यांवर आधारलेली आहे हे मांडणारे मतप्रवाह मोडतात. एकोणिसाव्या शतकातील पोर्तुगीज साम्राज्याच्या ढासळत्या प्रतिमेमुळे स्थानिकांनी बंड करून पोर्तुगीज सत्तेला आव्हान करू नये म्हणून एकेकाळी पूर्वेकडील रोम म्हणून ओळखले जाणाऱ्या सोनेरी गोव्याची प्रतिमा लोकप्रिय करण्यात आली होती. जेणेकरून स्थानिक उच्चभ्रू लोकांनी ते सोनेरी दिवस परतण्याची इच्छा बाळगून तसेच पोर्तुगीज साम्राज्यातच आपले हितसंबंध सुरक्षित राहतील हे आश्वस्त करण्यासाठी गोवा दुरादाचा वापर वेळोवेळी करण्यात येत असे. ह्या मतप्रवाहाला प्रतिक्रिया म्हणून गोवा इंडिका हा महाप्रवाहही लोकप्रिय झाला. गोवा इंडिका अंतर्गत गोवा हा भारतीय उपखंडाच्या कसा अविभाज्य भाग आहे, येथील लोक आणि संस्कृती हि युरोपीयन आणि कॅथॉलिक नसून ती भारतीय आणि हिंदू आहे हे मांडण्याचा प्रयत्न चालू होते. 

ऐशीच्या दशकात जेव्हा गोव्याच्या पर्यटनाचा धोरणात्मक विचार सुरु झाला तेव्हा गोवा दुरादा हि प्रतिमा गोव्याच्या मार्केटिंगसाठी वापरण्यात आली. गोवा एक  युरोपियन अस्मिता असलेला एक निद्रिस्त प्रदेश आहे. जिथे भारतात इतरत्र लागू असलेले नैतिकतेच्या चौकटी लागू नाही आणि त्यामुळे इथे काहीही चालते ह्या तत्वावर गोव्यातला पर्यटन व्यवसाय लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली. ह्या समजातून एका विशिष्ट पोताच्या पर्यटनाची सुरुवात गोव्यात सुरु झाली. इथले (उर्वरित भारतापेक्षा असलेले) स्वस्त राहणीमान, स्वस्त दारू, निरुपद्रवी स्थानिक लोक, समुद्रावर दिसणारे गोरे पर्यटक, ड्रग्स, कॅसिनो, रेव्ह पार्टीज, अश्या अनेक गोष्टी गोव्याच्या पर्यटनाशी जोडल्या जाऊ लागल्या. दिल चाहता है मध्ये दिसणारा गोवा हा ह्याच प्रतिमेची एक आधुनिक आवृत्ती आहे. फरक इतकाच कि चित्रपटात त्याला आत्मशोधाचे कल्पक संदर्भ जोडले आहेत. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गोवा हे पोर्तुगीज संस्कृतीने नटलेला प्रदेश आहे हा समज जसा पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी रूढ केला तसाच तो मुक्तीनंतरच्या काळात भारतीय सरकारनेसुद्धा केला. ह्यातून आधीच लिहिल्याप्रमाणे गोवा भारतीय प्रशासनात आणायला मदत झालीच पण गोव्यातील आणि भारतातील वसाहतवादाच्या इतिहासातील वेगळेपण आणि संघर्षांना बगल देण्यात यश आले.

गोव्यातील पर्यटन धोरणाचे राजकीय संदर्भ

स्वातंत्र्योत्तर भारतात गोव्याला प्रशासकीय तसेच सांस्कृतिकदृष्ट्या सामावून घेणे हे सोपे काम नव्हते. १९६१ सालापर्यंत पोर्तुगीजांच्या अखत्यारीत असलेला गोवा हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या संकल्पनेत ठळकपणे फारसा नव्हताच. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रीय प्रशासन गोव्यातील जनतेचा विश्वास संपादन करण्यात पूर्ण यशस्वी झाले नव्हते. नेहरूंच्या प्रयत्नांनी गोव्याला मुक्ती मिळाली आणि त्यासाठी नेहरूंबद्दल गोव्यातील लोकांना आदरही होता पण काँग्रेसला निवडणुकीत ह्या आदराचा काहीच फायदा झाला नाही. गोव्यातल्या स्वातंत्र्योत्तर राजकारणात पहिली दोन दशके तरी स्थानिक पक्षांचाच पगडा राहिला. हिंदू का कॅथॉलिक, अभिजन का बहुजन, मराठी का कोकणी, संघप्रदेश का महाराष्ट्रात विलीनीकरण ह्याच स्थानिक मुद्द्यावर गोव्यातले बरेचसे राजकारण विभागले होते. 

स्वातंत्र्योत्तर भारत हा प्रामुख्याने ब्रिटिश वसाहतीचा भाग असल्याने सरकारी कामकाज, प्रशासन, न्यायव्यवस्था ह्यात एक व्यापक समानता होती. पण गोवा पोर्तुगीज अमलाखाली असल्याने इथली प्रशासन आणि कामकाजाची पद्धती वेगळी होती. वेगळे कायदे अस्तित्वात होते. ती व्यवस्था एकाएकी झटकून देऊन एकहाती भारतीय प्रशासन पद्धती लागू करण्यात बऱ्याच अडचणी होत्या. गोव्यातल्या वेगळ्या व्यवस्थेमुळे व त्या व्यवस्थेला सरावलेला एक सत्ताधारी आणि व्यापारी वर्ग तयार झालेला होता. त्या वर्गाचे हितसंबंध, त्यांची स्थानिक अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेत असलेली मक्तेदारी हि अबाधित राखणेही गरजेचे होते. ह्यात आणखी एक भर म्हणून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेतील उदयाने पोर्तुगीज शासनकाळात सत्ता आणि सुबत्तेपासून वंचित राहिलेला बहुजन समाजही शिक्षण आणि सत्तेत थेट सामील होत होता. भारतातील इतर राज्यांत काँग्रेसने जसे प्रादेशिक पातळीवर प्रबळ असलेल्या जातीसमूहातील नेत्यांना तिकीट देऊन लोकशाही राबविण्याच्या नावाखाली सत्तेत आणून त्यांचे वर्चस्व कायम ठेवले तसे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रभावी यशामुळे गोव्यात त्यांना करता आले नाही. ह्या सर्व कारणांमुळे गोवा हा एक वेगळेच समाजभान असलेला प्रदेश आहे असे चित्र राष्ट्रीय पातळीवर उभे राहिले. नेहरूंच्या ‘अजीब है ये गोवा के लोग’ ह्या वाक्यातून गोव्याविषयी राष्ट्रीय पातळीवर असलेला संभ्रम अचूकपणे अधोरेखित होतो.

ह्या एकूणच संभ्रमावर आणि सत्तांतराच्या अडचणींवर मात करण्यासाठी पर्यटन हा एक नामी उपाय ठरला. गोव्याला प्रशासकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतात सामावून घ्यायचे असेल तर ते गोव्याचे वेगळेपण अधोरेखित करूनच घ्यावे लागेल हे केंद्र सरकारला कळून चुकले. हेच तथाकथित सांस्कृतिक वेगळेपण गोव्याच्या पर्यटन धोरणाचा पाया बनले. तथाकथित ह्याचसाठी कि हे वेगळेपण एक व्यापक हेतू साध्य करण्यासाठी केलेल्या प्रक्रियेतून निर्माण केले होते. त्या पुढे जाऊन ह्या वेगळेपणाचा अनुभव पर्यटनाद्वारे भारतातील तसेच भारताबाहेरील प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. खाण व्यवसायानंतर पर्यटन उद्योग गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भागीदार बनला.

गोव्यातल्या पर्यटन उद्योगाचे भविष्य आणि आव्हाने

आज ह्याच प्रतिमांच्या पुनरावृत्ती करून गोव्यात नवीन पद्धतींनी पर्यटकांना येणासाठी भुलविले जाते. गोवा आता केवळ एक विश्रांतीसाठीचे ठिकाण राहिले नसून ते डेस्टिनेशन वेडिंग, सेकंड होम्स, विविध सांस्कृतिक महोत्सवाचे केंद्र बनत चालले आहे. पणजीच्या मांडवीकिनारी तरंगत्या कॅसिनोजना परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे आता वर्षभर गोव्यात पर्यटकांची गर्दी असते. सहा महिन्याचा पर्यटन मोसम आता बारमाही झाला आहे. २००५ सालापासून गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जाऊ लागला. हल्लीच सुरु झालेल्या सेरेंडिपिटी महोत्सवाचे गोवा कायमस्वरूपी केंद्र बनले आहे. सनबर्न फेस्टिवल इथे दरवर्षी होतो. पण ह्या प्रक्रियेत जशी सुरुवातीला स्थानिकांची भागीदारी होती ती कमी होत होत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाची मक्तेदारी वाढत चालली आहे. सगळ्यांनाच गोव्याची हक्काची जागा आणि हवं ते करण्याची मुभा पाहिजे. सेकंड होम्समुळे गोव्यातल्या जमिनींचे भाव वाढून स्थानिकांना इथे घर किंवा जमीन घेणे आवाक्याबाहेरचे बनले आहे. 

दुसरी चिंताजनक गोष्ट म्हणजे गोव्याच्या अर्थव्यवस्थेची पर्यटन व्यवसायावर असलेली भिस्त. कोविडकाळात ह्याची तीव्रता ठळकपणे लक्षात आली. आधीच २०१२ च्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाने गोव्यातील खाण उद्योग ठप्प आहे आणि त्यात पर्यटन व्यवसायाला बसलेली खिळीमुळे अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ह्यामुळे केवळ सरकारी तिजोरी भरावी म्हणून कोविडकाळात सुद्धा लोकांच्या हिताचा विचार न करता घाईघाईने गोवा पर्यटनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. हे धाडस कधीपर्यंत टिकेल किंवा इथल्या व्यवस्थेवर त्याचे काय परिणाम होतील हे आत्ता सांगता येणे कठीण आहे. गोव्यात गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या सामाजिक चळवळींमध्ये हे संघर्ष प्रामुख्याने दिसून येतात. राष्ट्रीय पातळीवर हे संघर्ष वरकरणी जरी दिसत नसले तरी ते आतून धुमसत आहेत आणि ह्या सगळ्याला सरसकट विरोध करणारी एक प्रतिक्रियात्मक राजकीय चळवळ भविष्यात जोर घेऊ शकते. 

दिल चाहता है च्या शीर्षक गीतात लिहिल्याप्रमाणे ‘ये ख़ुशी रहे रोशनी राहे अपने वास्ते’ हि गोव्याने आपली प्रतिमा तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी कायम ठेवण्याची ‘नॉट सो माफक’ अपेक्षा गोव्याकडून बऱ्याच लोकांची आहे. गोव्याच्या ह्या पर्यटनभिमुख प्रतिमेचे भांडवलीकरण किती आणि कधीपर्यंत चालू राहील हे माहित नाही पण ते चालू स्वरूपात कायमचे राहू शकत नाही हे खरे.

 

संदर्भ

  • Trichur, Raghuraman. Refiguring Goa: From Trading Post to Tourism Destination. Goa1556, 2013.
  • Parobo, Parag D. India’s First Democratic Revolution: Dayanand Bandodkar and the Rise of the Bahujan in Goa. Orient Blackswan, New Delhi, 2015.
  • Anjaria, Ulka, and Jonathan Shapiro Anjaria. “Text, genre, society: Hindi youth films and postcolonial desire.” South Asian Popular Culture 6.2 (2008): 125-140.
  • Daniel Blei. Inventing the Beach: The Unnatural History of a Natural Place. Smithsonian Magazine (2016) https://www.smithsonianmag.com/history/inventing-beach-unnatural-history-natural-place-180959538/
  • Fernandes, Jason Keith. India Made Goa Portuguese. Herald (2015). http://dervishnotes.blogspot.com/2015/10/india-made-goa-portuguese.html
  • Pinto, Rochelle. Between Empires: print and politics in Goa. New Delhi: Oxford University Press, 2007.

The Howlround Marathon note

Hello.

My name is Kaustubh Naik. I am a playwright and doctoral student from India, currently based in Philadelphia, USA. I would like to thank the Segal Centre for putting up this marathon and Tanvi and Abhishek for asking me to speak here. Back in India, I oversee a 71-year-old theatre company called the Hauns Sangeet Natya Mandal, founded by my grandfather Vishwanath Naik, in the year 1950. Before the pandemic, we were gearing up to celebrate the 70th year anniversary of our theatre company and were in the process of putting together a theatre festival back in Goa, where we primarily work. That, however, did not materialize. We had to suspend our operations. However, when things opened up in India for some time, we managed to put together a production of my second play, Bhawaal, which had a brief run of 3 shows before we got shut again. This production was perhaps not the best to be produced amidst a global pandemic as it had almost 22 actors on stage. I don’t know when we will be able to perform it again. 

In the meanwhile, we watched India plunge further into the moral and social abyss that it has become over the last few years. Not that India was a democratic utopia before 2014, i.e. the year when the fascist BJP govt under the leadership of Narendra Modi took charge of affairs. But even the most pessimistic people like me will agree that the overall fabric of India’s political life has changed since then. Beginning from the killing of Muslim men over suspicions of carrying beef, till the most recent revelation that India has been using Israeli surveillance software to snoop on its own people, a list that includes high profile politicians, businessmen, political activists and even a virologist. We’ve stood trying to hold our communities as the ground beneath us turns into quicksand. Prominent political activists such as Sudha Bharadwaj, academics like Anand Teltumbde, Hany Babu, are in prison and so are two of the students from my former university ie JNU, Sharjeel Imam and Umar Khalid. All of them have been framed under the draconian laws that claim to seek preventive interventions against terror but are used to incarcerate young and marginalised dissenters. 

While the political gloom is writ large, the pandemic and its effects have pushed the country into one of its harshest phases. We’ve seen migrant workers walking miles to reach their native homes, people resting near the train track being run over, people dying not only due to lack of medical facilities but also for the sheer mismanagement and apathy of the Govt’s side. And just today, the ruling class is blatantly lying in the parliament that there have been no deaths due to lack of oxygen. Each death has been reduced to a mere data point for the government, not accounting for the magnitude of the crisis. 

When the covid crisis was at its peak in India, the ruling dispensation was asking people to remain positive, share the good news, feel better as if almost gaslighting the entire nation into toxic positivity. Our memories and our emotions were being erased in this sorry state of a republic that India has been turned into. And this is where I think theatre needs to intervene from hereon. At the core of theatre, it involves people coming together to participate in a collective emotional experience. Pandemic has robbed us of that. When we go back to theatres, and we will, we must address these erasures and restore the emotions that we’ve not been afforded to possess in the public consciousness. Families have lost their dear ones without being able to grieve. People have been subjected to violence and injustice but are deprived to feel enraged about it. Our emotions and memories are sovereign too. We cannot let a fascist government tell us how to feel and what to remember. Theatre will have to restore our emotional spectrum. Not just with positivity but also with the rage that would create radical solidarities for a fight that is yet to come. In one of Abhishek’s plays, a character says “people come to the theatre to watch what they already know, what they are afraid of forgetting”. For Abhishek, and for many of us, theatre is a repertoire of public memory and thus when we go back to the theatres, it is important that we remember and remind everyone what all has happened. Amir Aziz, a young poet from India, during the protests in India against a discriminatory citizenship act, fiercely wrote “Sab Yaad Rakha Jayega” – everything will be remembered. Roger Waters of Pink Floyd recited the same poem in London and relayed the solidarities. I think we theatremakers in India should heed Amir’s call to remember, document, and remind our public what all has happened and create experiences where we can feel all those emotions that we have either deferred or were not allowed to experience. 

The second and perhaps a larger virus we are facing in India, and elsewhere, concerns how truth is being manipulated. We have seen post-truth become a colloquial word globally in the last few years. In India especially, we are witnessing a shift in the media which sides not with people but with the fascist regime. What it has effectively done is to deny people of their experiences, run media trials, and in the course of it, deface truth. We are constantly bombarded with state propaganda while people who are injured by this state are struggling to relay their side. The media is participating in the abetment of violence, gaslighting the population and becoming the vehicle for the megalomania of India’s political leadership. Theatre has a very curious relationship with the truth. As theatremakers, we routinely incur great debt to the truth. By staging a lie, we are effectively honing people’s ability to tell the truth from untruth. Digital media is effectively eroding people’s ability to discern truth from untruth. Therefore, as theatre makers, I think we should work towards restoring that ability and help our communities become more aware and argumentative. Susan Sontag writes that in a society that works and enriches itself by means of organized hallucination, artists should be less devoted to creating new forms of hallucination and more devoted to piercing through the hallucinations that nowadays pass for reality. The current regime in India is marked with a perverse theatricality. People who uphold and support this regime are in a perpetual suspension of disbelief. It is therefore contingent that we step up and mount works that effectively counter these mass hallucinations and create more democratic and inclusive spaces of truth through theatre.

Thank you!

Aaj Bazaar Mein

Rakht-e-dil baandh lo, Dil figaaron chalo
Phir hum hi qatl ho aaye yaaro, chalo
Aaj Bazaar mein, pa bajolaan chalo
– Faiz Ahmed Faiz

A few days ago, Manan recounted that Faiz thought of this poem when he was being taken to a medical appointment from prison in a tonga. He was handcuffed. People recognised him and started walking alongside him. The poem hits differently in the wake of Fr Stan Swamy’s death.

Let’s make no mistakes. The state murdered him in cold blood. It is crucial to put the onus where it lies. With his death, the hope for justice has died one more time, the promise of democracy further weakened, and the already dim lights of resistance further extinguished.

Wrote a few lines in rage today.

जरुरी नहीं कि जीते जी हमारे इन्किलाब आए
पर आए तो इन्क़िलाबों का सैलाब आए

इशारा है हुक्मरानों को और रहबरों को भी
सुननी मौत हो अगर तो सामने बेनकाब आए

गिराये जायेंगे लाशों पर बने तेरे सभी महल
कयामत आए तो तेरे गुनाहों का हिसाब आए

मेरे बाद भी लिखेंगे कैद ख्वाबों कि दास्तान
बस मेरे सांसों के नाम एक इंतेसाब आए

– कौस्तुभ

Hello from Philadelphia

It has been two months since I arrived in Philadelphia, and I have wanted to resume regular blogging about my time here. Not to ‘create content’ or drive traffic per se but to get into the regular writing habit. Barring the first week where I was irritated and disoriented when I realized the room unfurnished, and the bathroom was dirty to the extent that a slipper stuck on the floor did not move if you tried to push it.

Meanwhile, I went to campus on few occasions, met with few people and slowly trying to get myself accustomed to the neighbourhood. There are some decent supermarket and speciality stores within walking distance, so that helps. However, I might move up a block or two next semester with another friend from Delhi.

The US is weird. Capitalism is so ingrained into people’s lives here. It is not surprising that people here overemphasize community initiatives etc., because that kind of system is inherently lacking. This emphasis on individually negotiating the city may have its pros and cons, but it certainly makes you alienated. More ethnographic notes on the US of A later.

It is springtime now, and the weather is getting better, with an occasional cloudy day where it drizzles a bit. I usually avoid going out unless I have to meet someone or go to the supermarket. Last weekend I spent few hours at the park, and it felt nice. I should do that more often instead of doomscrolling on Twitter.

The biggest update is that I got vaccinated during the walk-in vaccination drive at the Convention centre. I am yet to get my second shot, but it already feels liberating.

Anyways. I hope to keep blogging a bit more frequently to log my notes of amusement about UPenn and Philadelphia.

PS: I ate cheesesteak and wasn’t impressed. I will give it another try.

लिस्बन -१

फोटोमध्ये किंवा युट्युबवर जसं दिसतं तसंच लिस्बन आहे. नजरेत भरणाऱ्या रंगीत इमारती, खिडक्यांतून बाहेर डोकावणारी म्हातारी माणसं, अरुंद चढ्या रस्त्यावरुन येजा करणारी पिवळी ट्राम, आणि प्रवाश्यांनी गजबजलेलं शहर. रस्त्यावरून येताजाता ‘बॉ दिया’ आणि ‘बॉ नॉयत’ म्हणणारे, मी गोव्याचा आहे हे समजल्यावर अधिक आपुलकीने विचारपूस करणारे अनोळखी लोक. युरोपमध्ये फिरताना कमालीचं एलियनेशन जाणवतं. आपण इथले नाही हि जाणीव सतत होत असते (आणि करूनही दिली जाते). पण लिस्बनमध्ये असं कधी वाटलं नाही. मी गोव्याचा असल्यामुळे असलेला पूर्वग्रह म्हणा का काहीही, पण युरोपमध्ये इतरत्र फिरताना कुठेही न जाणवलेली आपुलकी लिस्बनमध्ये जाणवली. हक्कानं आपलं म्हणावं असं शहर.

२०१७ मध्ये जेव्हा मी लिस्बनमध्ये गेलो तेव्हा अजिबातच प्रवास करायची मनस्थिती नव्हती. बाबा जाऊन दोनच महिने झाले होते. मी खूपच डिसओरिएंटेड होतो. त्यात जायची तयारी एकदम दोन आठवड्यात करायची होती. सगळ्या गोष्टी पथ्यावर पडल्या व शेवटी लिस्बनमध्ये पोचलो. प्रथमदर्शनी कोणाच्या प्रेमात पडावं तसं त्या शहराच्या प्रेमात पडलो. ते प्रेम आजही कायम आहे.

हा फोटो हा लिस्बनचे पेट्रन सेंट, सांव व्हिन्सेंट दे फोरा, ह्यांच्या पुतळ्याचा आहे.

लिस्बनला जाऊन झालेलं दुसरं प्रेम म्हणजे फर्नांडो पेसोआ. कॅफे ब्राजिलैराच्या बाहेर पेसोआचा एक पुतळा आहे. पेसोआ हा एक मॉडर्न पोर्तुगीज कवी आहे एवढं माहित होतं पण त्याचं साहित्य मी लिस्बनमध्ये असताना वाचलं आणि पुरता झपाटून गेलो. “To express something is to conserve its virtue and take away its terror” हे लिहिणारा पेसोआ मला लिस्बनमध्ये भेटला. त्याचं ‘बुक ऑफ डिस्कवायट’ हे पुस्तक मी नेहमी सोबत बाळगतो. कमालीचा एकटेपणा आणि दुःख अनुभवलेल्या ह्या अवलिया लेखकाने सुमारे पंच्याहत्तर टोपणनावांनी (heteronyms) लेखन केलं. प्रत्येक टोपणनावाचं स्वतंत्र चरित्र, त्याची स्वतंत्र राजकीय भूमिका, स्वतंत्र लेखन शैली पेसोआने विकसित केली. रिकार्डो रैस, बर्नाडो सुआरिस, अल्व्हारो काम्पूश हि त्याची गाजलेली heteronyms आहेत.

 

बेलेमध्ये गेलो असता तिथली जेरोमी मॉनेस्ट्री, बेलें टॉवर, कामोईशची समाधी पाहत मी पाद्रांव दूश देशकोम्ब्रीमेंतूश (the monument of discovery) पाशी आलो. युरोपहून भारतासाठी निघालेलं वास्को द गमाचं जहाज हे ह्याच बंदराहून निघालं होतं. आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतापर्यंत पोचण्याचा समुद्रमार्ग शोधण्याच्या तसेच पोर्तुगालहून झालेल्या इतर डिस्कव्हरी अंकित करण्यासाठी १९३९ साली हे स्मारक बनवलं होतं. ह्या स्मारकाच्या तळाशी वर्णभेद आणि नागरिकतेवर एक प्रदर्शन भरवलं आहे. आफ्रिकन लोकांच्या गुलामगिरीवर पोसलेला युरोपियन वसाहतवाद हा ह्या बंदरापासून सुरु झाला. त्याच बंदरावर त्या गुलामगिरीमुळे झालेली आणि आजही अव्याहत सुरु असलेली आफ्रिकन लोकांच्या वर्णभेदाचा अनुभव सांगणारी कहाणी सांगणारं हे प्रदर्शन आहे.

युरोपियन वसाहतवादाचं चक्र सुरु करून देणारं लिस्बन शहर आज स्वतःच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्विरोधाचं ओझं घेत उभं आहे. पोर्तुगालने आजपर्यंत अनेक राजकीय स्थित्यंतरं बघितली आहेत. आताही पोर्तुगाल एका भीषण आर्थिक धक्क्यातून वाट काढत आहे. ह्या प्रक्रियेत लिस्बनमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. परदेशी चलन अर्थव्यवस्थेत यावं आणि अर्थव्यवस्था खेळती राहावी म्हणून तिथलं सरकार आता पर्यटन आणि रियल इस्टेटमधील गुंतवणुकीवर भर देत आहे. रियल इस्टेटमधील परदेशी गुंतवणुकीच्या बदल्यात पोर्तुगीज नागरिकत्व बहाल करण्यात येत आहे. ह्याची दुसरी बाजू म्हणजे तिथे पूर्वीपासून राहणाऱ्या अनेक लोकांवर त्यांची घरं खाली करण्याची पाळी आली आहे.

पण हे सर्व बदल होताना युरोपमध्ये इतरत्र दिसणारा फॅसीजम पोर्तुगालात (सद्यातरी) दिसत नाही. ह्याचं एक कारण म्हणजे सालाझारच्या राजवटीचे दुष्परिणाम बघितलेली पिढी आजही पोर्तुगालमध्ये आहे आणि परिस्थिती कितीही बिकट झाली तरी एकाधिकारशाही हा काही पर्याय असू शकत नाही हे त्यांना मनोमन वाटतं असं तिथल्या एका इतिहासकाराचं म्हणणं आहे.

बेलग्रेड

सर्बियाची राजाधानी आणि त्याआधी युगोस्लव्हियाची राजधानी म्हणून बेलग्रेड प्रसिद्ध आहे. खरंतर अगदी रोमन साम्राज्यापासूनच ते एक प्रमुख युरोपियन शहर आहे. आम्ही तिथे २०१८ साली जेएनयूतर्फे एका परिषदेसाठी गेलो होतो. सर्बिया देशात जायला भारतीय पासपोर्टधारकांस व्हिजा लागत नाही. पण त्यामुळे तिथले इमिग्रेशन ऑफिसर्स तुमची तितकीच कसून चौकशी करतात.

रशिया-अमेरिकेच्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर तिथले कम्युनिस्ट क्रांतिकारी नेते जोसिप टिटो ह्यांनी नॉन अलाईनमेंट मूव्हमेंट (अलिप्त राष्ट्रगट चळवळ) सुरु केली. भारत आणि तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंचा ह्यात प्रमुख वाटा होता. बेलग्रेड हे नॉन अलायन्ड मूव्हमेंटचे उगमस्थान आहे. त्याच्या स्मरणार्थ नोवी साद आणि जुनं बेलग्रेड ह्या भागांना जोडणाऱ्या एका पुलापाशी एक ओबेलिस्क (दगडी स्तंभ) उभारण्यात आलेला आहे. नॉन अलायन्ड मूव्हमेंटमुळे तिथल्या लोकांमध्ये भारताविषयी आणि नेहरूंविषयी कमालीचा आदर आहे. ह्याची साक्ष देणारा एक छोटासा किस्सा घडला. आमचे जेएनयूमधील काही मित्र बेलग्रेड शहराच्या बाहेर फिरण्यासाठी गेले होते. संध्याकाळी परत येताना उशीर झाला त्यामुळे त्यांनी परत यायची शेवटची बस चुकली. दुसरी कुठली बस मिळेल ह्या प्रतीक्षेत तिथे उभे असता एका म्हाताऱ्या सर्बियन माणसाने त्यांना पाहून आपली गाडी थांबवली. ‘फ्रॉम इंडिया?’ असं विचारत त्यांना गाडीत बसवले आणि नेहरू आणि इंदिरा गांधीविषयी किस्से सांगत बेलग्रेडपर्यंत आणून सोडले.

तिथे बॉलीवूड चित्रपट आणि हिंदी टीव्ही मालिका प्रचंड प्रसिद्ध आहेत. तिथली लोकं ‘बालिका वधू’ हि मालिका अत्यंत आवडीने बघतात असे कळले. बेलग्रेड विद्यापीठातल्या एका मैत्रिणीच्या घरी तिच्या वाढदिवसानिमित्त गेलो होतो. तिथल्या नाट्यविभागात शिकणाऱ्या इतर मुलांशी ओळख झाली. त्यातल्या एकाने आमिर खान आणि काजोल ह्यांच्या ‘फना’ चित्रपटातील गाणी म्हणून दाखवली आणि कबीर बेदी हा त्याचा आवडता अभिनेता असल्याचे सांगितले.

बाल्कन भागातल्या सततच्या राजकीय घडामोडीमुळे सर्बिया हे राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेलं आहे. आम्ही तिथे असता बोस्नियातील मुसलमान लोकांच्या नरसंहाराची जबाबदारी सर्बियन राज्याने आणि सैन्याने घ्यावी ह्यासाठी निदर्शने चालू होती. ९९ सालात झालेल्या नाटो बॉम्बिंगमध्ये मोडलेल्या काही इमारती अजूनही तश्याच पडझडीच्या अवस्थेत आहेत. टिटोची राजवट पाहिलेल्या पिढीचा एक कम्युनिस्ट नॉस्टॅलजिया आहे. स्टालिनलाही पुरून उरलेल्या हा नेता तिथल्या सोशालिजमच्या अस्तानंतर आजही एक आयकॉन आहे. सोशालिस्ट मॉडर्निज्म ह्या स्थापत्यशास्त्रातील प्रकारच्या अनेक इमारती इथे अजूनही पाहायला मिळतात.

आमचा मुक्काम बेलग्रेड विद्यापीठातल्या एका प्राध्यापिकेच्या घरी होता. एकदा विद्यापीठात जाताना तिने आम्हाला बाहेर इशारा करून एक इमारत दाखवली. ती इमारत तिथल्या कम्युनिस्ट लीगचं प्रमुख कार्यालय होतं. आता तिथे एक बिजनेस सेंटर आणि मॉल आहे.

हा फोटो हा बेलग्रेड शहरातील झेमून ह्या भागातल्या गार्दोस टॉवरचा आहे

जर्मनी

खरं सांगायचं तर मला प्रवास करणं खूपच किचकटीचं काम वाटतं. पण ह्या न त्या कारणाने गेल्या काही वर्षात भारतात आणि भारताबाहेर मी बऱ्यापैकी फिरलो आहे. आता घरात बसायची सक्तीच झाल्यामुळे #throwback च्या नावाखाली प्रवासातले काही जुने फोटो मी इंस्टाग्रामवर अपलोड करत होतो. त्या जोडीला त्या प्रवासातल्या काही आठवणी ताज्या आहेत तर लिहून काढाव्या हा विचार मनात आला. खरंतर माझ्या प्रवासावर काहीतरी लिहावं असं मला सारखं वाटत असतं पण आळसावर मात करून ते साध्य करणं जमत नाही. ह्याही वेळेस जमेल का नाही माहित नाही पण नियमित काहीतरी लिहावं म्हणून हा प्रयत्न करतोय.

हा पहिला फोटो जर्मनीतला. अगदी पहिल्या परदेशवारीचा. राष्ट्राच्या सीमा काय असतात, त्या कशासाठी असतात, वर्णभेद काय असतो, कुठल्यातरी एम्बसीत बसलेल्या कुणा ऑफिसरच्या हातात तुमची स्वप्नं, महत्वाकांक्षा असणं म्हणजे काय वगैरे सगळे त्रास एकत्र अनुभवायचे असतील तर युरोपला जाणे करावे. एक अमेरिकावारी सोडल्यास इमिग्रेशन आणि वीजाचे किस्से हमखास माझ्याबाबतीत झालेत. प्रसंग आल्यास तेही लिहीन इथे कधीतरी. तूर्तास जर्मनीकडे वळू. पहिल्यांदा जर्मनीत गेलो तेव्हा कोलोन शहरात मुक्काम होता. दुसऱ्यांदा गेलो तेव्हा कोलोनबरोबर बर्लिन आणि म्युनिक हि दोन शहरे बघितली. बर्लिनविषयी वेगळं लिहीन इतकं ते शहर मला आवडलं.

म्युनिक मध्ये असताना डाकाव कॅम्प पाहायला गेलो होतो. १९३३ साली सुरु झालेला हा कॅम्प बहुधा पहिला कॅम्प असावा. तिथल्या एका दालनात नाझी पार्टीचा उदय कसा झाला ह्यावर एक प्रदर्शन आहे. आपल्याकडची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर हा इतिहास जरूर वाचावा. ज्या बीयर हॉल मध्ये नाझी पार्टीची पहिली बैठक झाली तोही हॉल पहिला.

जर्मनीत फिरताना दुसऱ्या महायुद्धाच्या आधी आणि नंतर जे काही घडलं त्याची आठवण करून देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. कोलोनमधल्या फूटपाथवर सपाटीवरून थोड्याश्या बाहेर येणाऱ्या ब्रास प्लेट्स बसवल्या आहेत. त्याला स्टॉलपरस्टाईन म्हणतात. ह्या प्लेट्सवर नाझी संहारात मारल्या गेलेल्या ज्यू लोकांची नावं आहेत. ह्या प्लेट्स त्या लोकांच्या शेवटच्या माहीत असलेल्या जागांवर लावलेल्या आहेत. त्या एकतर तुम्हाला चालताना दिसतील किंवा त्यावरून चालत गेलात तर काहीसे अडखळाल. ह्या न त्या प्रकारे तुमचं लक्ष वेधून घेऊन नाझी पार्टीने ज्यू लोकांविरुद्ध केलेल्या अत्याचारांची आठवण ह्या प्लेट्स करून देतात.

 

हा फोटो रुडसाईम ह्या ऱ्हाईन नदीच्या काठी वसलेल्या गावातला आहे. जर्मन राजवटीच्या स्थापनेच्या स्मरणार्थ एकोणिसाव्या शतकात हे स्मारक बांधलं होतं. तिथल्याच मागील एका विनयार्डात ‘राष्ट्रवाद हा पर्याय नाही’ अश्या आशयाचा एक संदेश मोठ्या अक्षरात लिहिला होता.