जब आदमी मर जाता है तब उसका क्या रह जाता है? बस एक यादगारी….
काही पुस्तकं वाचून संपली तरी हातावेगळी करता येत नाही. “रारंग ढांग” हि अशीच एक कादंबरी एका बैठकीत वाचून मी संपवली पण तिची नशा अजून उतरलेली नाही. किंबहुना कालांतराने ती चढतच राहील. निसर्गापुढे आपलं अस्तित्व खुजं पण तरिही आपल्या जिद्दीच्या बळावर त्या आकाशात घुसलेल्या हिमालयीन पहाडावर कोणाच्याही नजरेत भरावी एवढी एक स्पष्ट रेघ मारणाऱ्या विश्वनाथची हि एक विलक्षणीय कथा गेली तीन दशके मराठी साहित्यात निर्विवादपणे एका अढळपदावरच बसली आहे.
ह्याच कादंबरीवर आधारित “पाण्याखालचं बेट” हे माझ्या वडिलांनी लिहीलेलं नाटक २९ जानेवारी २०१३ रोजी कला अकादमीच्या “अ” गट नाट्यस्पर्धेत “हंस संगीत नाट्य मंडळा”तर्फ़े सादर होणार आहे. जरुर या!